नागपूर शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीघेतली बैठक
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (एमएसआयडीसी) व कारागृहाच्या अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवनाच्या सभाकक्षात घेतली. यावेळी नागपूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी)चे महासंचालक ब्रजेश दीक्षित, नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी व अजय चारठाणकर, नागपूर महापालिकेच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त मिलिंद मेश्राम,नगररचना विभागाचे सहसंचालक ऋतुराज जाधव आदी उपस्थिती होती.