रेमडेसिविर जागी कोरोना बाधित रुग्णांला दिल अ‌ॅसिडिटीचे इंजेक्शन; रेमडेसिविरचा केला काळाबाजार.
रेमडेसिविर जागी कोरोना बाधित रुग्णांला दिल अ‌ॅसिडिटीचे इंजेक्शन; रेमडेसिविरचा केला काळाबाजार.

रेमडेसिविर जागी कोरोना बाधित रुग्णांला दिल अ‌ॅसिडिटीचे इंजेक्शन; रेमडेसिविरचा केला काळाबाजार.

रेमडेसिविर जागी कोरोना बाधित रुग्णांला दिल अ‌ॅसिडिटीचे इंजेक्शन; रेमडेसिविरचा केला काळाबाजार.
रेमडेसिविर जागी कोरोना बाधित रुग्णांला दिल अ‌ॅसिडिटीचे इंजेक्शन; रेमडेसिविरचा केला काळाबाजार.

युवराज मेश्राम,नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.6मे:- नागपुरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसच्या महामारीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यात कोरोना वायरस बाधित रुग्णांचा टाळूवरच लोणी खाणारे काही भष्ट्र आरोग्य सेवक कर्मचारी आणि डॉक्टरमुळे आज संपुर्ण आरोग्य यंत्रणा धोक्यात आली आहे. अशीच एक धक्कादायक बातमी नागपुर येथून समोर आली आहे. अती दक्षता विभागातील आयसीयूमध्ये दाखल अत्यवस्थ कोरोना वायरस बाधित रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन ऐवजी चक्क अ‌ॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले आणि त्या रुग्णांसाठी आनलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नागपुर येथील जामठा परिसरा असलेले ‘कोविडालय’ नावाच्या कोरोना रुग्णालयात दिनेश गायकवाड नावाच्या पुरुषनर्सला अती दक्षता विभागात दाखल असलेल्या आणि अत्यवस्थ असलेल्या एका कोरोना वायरस बाधित रुग्णाला लावण्यासाठी रुग्णालयाकडून तीन रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले होते. पण दिनेश गायकवाड (आरोपी पुरुषनर्स) ने देण्यात आलेल्या तीन इंजेक्शन पैकी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याकडे ठेवले आणि त्याऐवजी अत्यवस्थ रुग्णाला चक्क अ‌ॅसिडिटीचे इंजेक्शन लावले. व रुग्णालयातील रेकॉर्डवर कोरोना वायरस बाधित रुग्णाला तीन रेमडेसिवीर इंजेक्शन लावल्याची माहिती नोंद केली.

आरोपी पुरुष नर्स दिनेश गायकवाडने रुग्णालयातून चोरलेले दोन्ही इंजेक्शन्स आपल्या घरी लपवून ठेवले. मात्र, दोन दिवसांनी हे इंजेक्शन त्याचा रुम मध्ये राहणा-या मित्राने एका दुसऱ्या रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करत असलेल्या शुभम पानतावणे नावाच्या मित्राने चोरले. शुभम त्याच्या प्रणय येरपुडे आणि मनमोहन मदन नावाच्या इतर मित्रांच्या मदतीने एका इंजेक्शन 35 हजार रुपये दराने काळाबाजारी करताना पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी जेव्हा शुभम पानतावणेची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने हे इंजेक्शन दिनेश गायकवाड याच्या कपाटामधून चोरल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिनेश गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हे इंजेक्शन ‘कोविडालय’ या रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका अत्यवस्थ रुग्णासाठीचे असून त्याला रेमडेसिवीरऐवजी अ‌ॅसिडिटीचे इंजेक्शन लावल्याचे दिनेश गायकवाडने पोलिसांना सांगितले.

सीताबर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दिनेश गायकवाड, शुभम पानतावणे, प्रणय येरपुडे, मनमोहन मदन या चार आरोपींसह एका महिला डॉक्टरलाही अटक केली आहे. ही महिला डॉक्टर एका तिसऱ्या रुग्णालयाची असून ती हे इंजेक्शन पुढे काळाबाजार करुन विकण्यात मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here