मराठा समाज पुन्हा काढणार मोर्चा, पहिल्या मराठा मोर्चाचं ठिकाणही ठरलं.
✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड,दि.6मे:- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने या निर्णयाचे महाराष्ट्र तिव्र पडसाद उमटत आहे. महाराष्ट्रात आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. असे मराठा नेते बोलत आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.