महाराष्ट्रातील प्रसिद्ध कव्वाल गायक सरवर जानी यांचं अल्पशा आजाराने निधन. संपूर्ण कला विश्वात शोक.

✒प्रशांत जगताप,कार्यकारी संपादक✒
हिंगणघाट,दि.6मे:- महाराष्ट्रातील पुरोगामी महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकराचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोप-यात, घरघरात पोचवणारे प्रसिद्ध कव्वाल गायक सरवर जानी यांचं अल्पशा आजाराने आज निधन झालं आहे. प्रसिद्ध कव्वाल गायक सरवर जानी यांचं निधनामुळे संपूर्ण कला विश्वात शोक

महाराष्ट्रामधील प्रसिद्ध कव्वाल गायक सरवर जानी यांचं निधन झालं आहे. ते माघील काही दिवसापासुन बिमार होते अशी माहिती आहे समोर आली आहे. गेले अनेक दिवस ते दवाखान्यात दाखल होते. त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

6 मे रोजी दुपारच्या सुमारास सरवर जानी यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. सरवर जानी हे एक प्रसिद्ध आंबेडकरी चळवळीचे कव्वाल गायक होते. 1985 च्या दशका पासुन त्यानी आपल्या समाज जागृतीचा आणि आंबेडकरी चळवळीला आपल्या प्रबोधनाने आवाजाने अटकेपार नेला.त्यांनी हिंदी मराठी आणि उर्दू मध्ये हजारो गाणी लिहली आणि गायली. त्यांनी गायलीले झाली रमाई महान, होती गरीबीची जाण, अशी माऊली मला दाखवा. आणि ये भिवा तू या जगाला हवा ही कव्वाली तर संपुर्ण महाराष्ट्रात गाजली होती.

त्यांनी भीम आणि बुद्ध गिताचा अल्बम “एकीने करा वार” जारी केला होता. यानंतर, त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. सरवर जानी यांनी प्रकाश पाटनकर, किरण पाटनकर, सुषमा देवी, आंनंद शिंदे, अंजली भारती, मिलिद शिंदे आणि इतर अनेक मातब्बर कव्वाला बरोबर हजारो गाणी कव्वाली गायली. सरवर जानी यांनी अनेक सदाबहार बुद्ध आणि बाबासाहेबावर गाणी गायली आहे. याशिवाय त्यांनी कव्वालीचा बादशाहा जानी बाबु बरोबर पण कव्वाली गाऊन आपल्या गायकीची झलक दिली आहे. ऑगस्ट 1952 मध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्या धमाकेदार कव्वाली, शायरी, प्रबोधनाने सर्वांना प्रभावित केलं.

आंबेडकरी प्रबोधनाचा हिरा हरवला

आंबेडकरी चळवळीचा प्रबोधनकार हिरा हरवल्याने भीम आणि आंबेडकर अनुआयावर आणि कव्वाल गायकी क्षेत्रांत शोकाकळा पसरली आहे. सरवर जानी यांच्या जाण्याने खुप मोठी हानी झाली त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांविषयी मिडिया वार्ता न्यूज़ कडून मनःपूर्वक संवेदना.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here