वर्धेत रेमडेसिव्हीरच इंजेक्श्न्स उत्पादनाला सुरूवात.
✒️आशिष अंबादे,वर्धा जिल्हा प्रातिनिधी✒️
वर्धा,दि.6मे:- विदर्भात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस प्रादुर्भाव दिसून येत आहे. वर्धेतुन विदर्भासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. कोरोना बाधित रुग्णांचा उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन खुप महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे पण समोर आले आहे. कोरोना वायरस बाधित रुग्णांसाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन खुप कमी आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन आता वर्धेत सुर झाले आहे. त्यामुळे विदर्भातील कोरोना रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
भारत सरकारने सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस आणि हैद्राबाद येथील हेक्ट्रा या दोन कंपनीला या साठी परवानगी दिली आहे. या दोन कंपनीच्या मदतीने हे काम सुरू झाले आहे. पहिल्या फेरीत 25 हजार इंजेक्शखन निर्माण करण्याकरिता आवश्याक असलेले कच्चे साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यानुसार हे काम करण्यात येणार आहे. या कामाकरिता तांत्रिक आणि इतर सर्व संवर्गातील एकूण शंभर कामगार कार्यरत राहणार आहे.
सतत काम करणाऱ्या या कामगारांच्या परीश्रमातून हे इंजेक्शसन निर्माण करण्यात येणार आहे. ते केंद्राच्या स्वाधीन करण्यात येणार असून त्यांच्याकडून गरजेनुसार ते राज्यातील जिल्ह्यांना देण्यात येणार आहे. 25 हजाराच्या खेपेनंतर उत्पादन वाढवून ते 30 हजारांवर नेण्याचा प्रयत्न आहे. पहिले 25 हजार इंजेक्शपन 15 मे पर्यंत तयार करण्याचा मानस असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.