शिक्षक देवचंद मेश्राम यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक होणार केव्हा?
शिक्षक देवचंद मेश्राम यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक होणार केव्हा?

शिक्षक देवचंद मेश्राम यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक होणार केव्हा?

शिक्षक देवचंद मेश्राम यांचा परिवार अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत.
पोलिस विभागाची भुमिका संशायास्पद काय?
⊗ शिक्षक देवचंद मेश्राम यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी खुलेआम.
आरोपींना अटक न झाल्यास परिवारासह उपोषणाला बसणार.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, दिल्ली यांच्या कडून या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना अहवाल सादर करण्याचे आदेश.

शिक्षक देवचंद मेश्राम यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक होणार केव्हा?
शिक्षक देवचंद मेश्राम यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक होणार केव्हा?

अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपूरी:- ब्रम्हपूरी शहरातील पोलिस स्टेशनलगत असलेल्या कोट तलावात कुडेसावली येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक यांनी दिनांक २/४/२१ ला आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी खिशात एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये गट शिक्षणाधिकारी प्रमोद नाट, शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप उपलंचिवार, मुख्यधापक संजय बट्टे, मोरेश्वर गुरुनुले यांची नावे असुन यांच्या जातीवाचक मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहुन ठेवले. यानुसार ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला दिनांक २/४/२१ ला भारतीय दंड संहिता ३०६ आणि अनुसूचित जाती -जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ ,३(२) (va) अर्तगंत गुन्हा दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात परिवारातील सदस्यांचे बयान घेण्यात आले. पण या प्रकरणातील आरोपींना एक महिना लोटुन गेला असुनही अद्यापही अटक करण्यात आली नाही.

आरोपींना अटक न झाल्याने त्यांनी ११/४/२१ ला दोन अनऒळखी इसम घरी येऊन पोलिस स्टेशनला देण्यात आली तक्रार वापस घेतली नाही तर पाहुन घेण्यांच्या धमकी देऊन गेले. याबाबत देवचंद मेश्राम यांच्या पत्नी संघमित्रा मेश्राम यांनी १२/४/२१ ला पोलिस स्टेशनला गुन्हा क्र. २९९/ २०२१ तक्रार दाखल केली. या घटनेपासून सदर परिवारा मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिवास धोका निर्माण झाला असुन सदर आरोपी प्रमोद नाट यांच्या वर दिनांक १०/३/२१ ला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अर्तगंत गुन्हा दाखल करण्यात आले होते. पण सदर प्रकरणात जाणिवपूर्वक अटक करण्यात आली नसल्याने आरोपींनी तेव्हा सुध्दा अटकपूर्व जामीन घेतला. एक महिन्यात दोनंदा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अर्तगंत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आली नाही.

शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप उपलंचिवार यांच्या वर गुन्हा क्र.एम २/१८ दिनांक ४/८१८ ला आय.पी.सी.कलम १६६, २१८, २१९, ४१८, ४६८, ४७१ अर्तगंत गुन्हा दाखल असुन सुद्धा अजुनही यांना अटक करण्यात आली नसल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणाली प्रश्र्न निर्माण होत आहे. आरोपीना अटक न केल्याने त्यांना अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात प्रयत्नात आहेत.

दिपाली चव्हान प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली. पण शिक्षक देवचंद मेश्राम यांना आत्महत्या करणाऱ्या ना अजुनही अटक करण्यात आली नाही आमच्या वडिलांचा जिव गेले पण त्यांचे आरोपी अजुनही बाहेरच फिरत आहेत. आमच्या वडिलांना न्याय केव्हा मिळणार? आम्ही न्यायाची अपेक्षा कोणाकडे करावी? व या प्रकरणातील सदर आरोपीना त्वरीत अटक करण्यात यावी यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली, उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हपूरी, उपविभागीय अधिकारी ब्रम्हपूरी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली. आरोपीना त्वरीत अटक न झाल्यास आपल्या परिवारासह उपोषणाला बसणार असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here