पनवेल मध्ये माधवीताई जोशी यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

पनवेल मध्ये माधवीताई जोशी यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

पनवेल मध्ये माधवीताई जोशी यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

पनवेल मध्ये माधवीताई जोशी यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

✒️
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

पनवेल :- राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे. बहुपक्षीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना त्या सर्वांना लढत देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ.माधवीताई नरेश जोशी यादेखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत.आज दिनांक 5 मे रोजी मावळ लोकसभा निवडणूक २०२४ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ.माधवीताई नरेश जोशी यांचा मावळ दौरा पुर्णपणे यशस्वी ठरत आहे. पनवेल येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार वाहून पनवेल मध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात केली.या प्रचार रॅली दरम्यान आपल्या मतदार संघातील प्रत्येक मतदार हा जागरूकतेने लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा त्याला लोकशाहीचे योग्य ज्ञान असावे. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय,समान हक्क मिळण्याकरिता विशेष प्रयत्न असणार.या प्रचार दौऱ्या दरम्यान हजारो कार्यकर्त्यांची उपस्थि होती जनतेचा ध्यास मावळचा विकास हाच नारा देत प्रचार पूर्ण केला.असंख्य कार्यकर्ते,नेतेमंडळी,सुजाण मतदार या सर्वांच्याच माध्यमातून आज संपूर्ण पनवेल मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ.माधवीताई नरेश जोशी यांच्या प्रचारदौऱ्याचा झंझावात घुमत होता. माधवी ताईंनी पनवेल मध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत प्रत्येक मतदारा सोबत हितगुज साधले.माधवीताईंच्या कार्याचा झंझावत पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधवीताई भरघोस मतांनी विजयी होतील याकरिता आपणा सर्वांच्या विशेष सहकार्याची जोड नेहमीअशीच राहो असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.माधवीताई जोशी यांनी केले.