एका आयशर वाहनाने एका दुचाकी वाहन चालकास दिकी धडक

एका आयशर वाहनाने एका दुचाकी वाहन चालकास दिकी धडक

✍️त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर ✍️
मो 9096817953

भिवापूर.दुचाकीला धडक देणारे आयशर वाहन घटना स्थळावरून पळून गेले. पांजरेपार सरपंच किसना बोरकर यांनी वाहनाचा पाठलाग करून पोलिसांना दिला या आयशर वाहनांचा नबर

भिवापूर पासून ५ किमी अंतरावर असलेल्या जवराबोडी येथील बिअर बार जवळ एका आयशर वाहनाने एका दुचाकी वाहन चालकास धडक दिल्याने ४० वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याने घटना घडली. यावेळी परिसरातील नागरीकांनी भिवापूर ग्रामीण रुग्णालयात एकत्र येत आपला संताप व्यक्त केला. या घटनेत मृतकव्यक्ति लगतच असलेल्या मरूपार निवासी असून मृतकाचे नाव झिबल ऋषी मंगर असे नाव आहे.

झिबल मंगर हा सकाळी बँक ऑफ इंडिया, भिवापूर येथे पैसे काढण्या करीता आला होता. बँकेचे काम पुर्ण झाल्याने तो परत मरूपार येथे गावाकडे फॅशन – प्रो वाहन क्रमांक MH40 – 3906 याने जात असतांना जवराबोडी येथे आयशर वाहन MH 36 A A 3542 या वाहनाने मागून जबर धडक दिल्यामुळे झिंबल मंगर हा वाहनावरून खाली जखमी अवस्थेत पडला. अशातच जागीच त्याचा मृत्यु झाला. सदर घटना आज दि. ६ मे ला सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली घटनेची माहिती मिळताचपरिसरात नागरिकांची एकच गर्दी जमली. यावेळी पोलिसांनी मृतकाचा पंचनामा करून त्याला शवविच्छेदन करण्यासाठी भिवापूर ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. सदर घटनेचा तपास ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार भगवान दास यादव करीत आहे.