रेवदंडा आगर किल्‍ला परिसरात नियमबाहय बांधकामे ; कोणाचा वरदहस्त ग्रामस्थांच्या नाराजीने संप्तत प्रतिक्रिया

रेवदंडा आगर किल्‍ला परिसरात नियमबाहय बांधकामे ; कोणाचा वरदहस्त ग्रामस्थांच्या नाराजीने संप्तत प्रतिक्रिया

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- पुरातत्व विभागाचे केंद्रीय सर्वेक्षण विभागाचे वतीने रेवदंडा आगरकोट किल्‍ला परिसरात नियमावलीचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. मात्र रेवदंडा आगरकोट किल्‍ला परिसरात पुरातत्व खात्याची केंद्रीय सर्वेक्षण विभागाची नियमावली फक्‍त फलकांवर असून आगर किल्‍ला परिसरात नियमबाहय बांधकामे बिनधोकपणे केली गेली,व करण्यात येत असून या बांधकामास कोणाचा वरदहस्त आहे व पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षतेबद्दल इतिहास प्रेमी मंडळी व ग्रामस्थ यांची पुर्णतः नाराजी व्यक्‍त करत आहेत.
प्राचीन स्मारक 1958 च्या 24 व्या प्राचीन स्मारके आणि पुरातन स्थळे, व अवशेष अधिनियमान्वये राष्ट्रीय महत्वाचे म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. जर कोणी व्यक्‍ती या स्मारकाची नासधुस, स्थलांतर, हानी, स्वरूप बदल, खराबी, दुरूपयोग करेल अथवा धोक्यात आणेल, त्या व्यक्‍तीस दोन वर्ष कारावास किंवा एक लाख रूपये दंड अथवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील, तसेच नियम 32 अन्वये प्राचीन स्मारके, पुरातत्वयीय स्थळे, आणि अवशेष अधिनियम 1958 अन्वये संरक्षीत स्मारकांच्या सीमेपासून 100 मीटर पर्यंत आणि त्या पलिकडे 200 मीटर पर्यंत खणणे, बांधकाम करणे, यासाठी प्रतिबध्द आणी निर्बधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे असे या फलकांवर निर्देश केले आहे.
मात्र रेवदंडा आगरकोट किल्‍ला परिसरात मोठया प्रमाणात बेसुमार नियमबाहय बांधकामे झाली आहेत व सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी अवशेष, पुरातन वास्तू यांची मोडतोड करून नव्याने बांधकामे केली आहेत व सुरू आहेत. याबाबत अनेकदा स्थानिक ग्रामस्थांनी पुरातत्व खात्याकडे निवेदन दिले आहेत. मात्र ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदन पत्रास वारंवार केराची टोपली दाखविली जाते, पुरातत्व खाते ग्रामस्थांच्या निवेदनाने फक्‍त नोटीस काढण्याचे काम करते, नियमबाहय कामे मात्र थांबविली जात नाही. अथवा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. ही नियमबाहय बांधकामे बिनधोकपणे सुरू असल्याने पुरातत्व खात्याबद्दल नाराजी ग्रामस्थ व इतिहासप्रेमी मंडळी व्यक्‍त करत आहेत.
पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षण विभागानी जिर्णावस्थेतील जुने फलक हटवून नव्याने नियमावलीचे फलक नव्याने ठिकठिकाणी लावले आहेत. मात्र या फलकांवरील नियमावली येथे भेटी देणार इतिहास प्रेमी मंडळी व ग्रामस्थ यांना वाचण्यासाठी आहेत असेच म्हटले जाते. या फलकांवरील नियमावलीस फाटयावर मारून किल्‍ला परिसरात नियमबाहय बांधकामे पुर्ण केली गेली आहेत व अदयापी बांधकामे सुरू आहेत. पुरातत्व विभागाच्या या फलकांचा उपयोग काय ? ते कशाकरीता लावता ? असा संप्तत सवाल ग्रामस्थ व इतिहासप्रेमी मंडळी करत आहेत.
याबाबत पुरातत्व विभागाचे अधिकारी ए.एस.आय. बजरंग ऐलिकर यांचेशी संपर्क केला असता, कोणीही आगरकोट किल्‍ला परिसरात नियमबाहय बांधकामे केल्याचे आढळल्यास दोन वर्ष कारावास अथवा एक लाख रूपये दंड अथवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील, हे निश्‍चितपणे राबविले जाईल असे म्हटले.