अखिल भारतीय तेली समाज संघटनेची पवनार येथे आढावा बैठक संपन्न…* अहंकार सोडा समाज जोडा.

अखिल भारतीय तेली समाज संघटनेची पवनार येथे आढावा बैठक संपन्न…*

अहंकार सोडा समाज जोडा.

अखिल भारतीय तेली समाज संघटनेची पवनार येथे आढावा बैठक संपन्न...* अहंकार सोडा समाज जोडा.
अखिल भारतीय तेली समाज संघटनेची पवनार येथे आढावा बैठक संपन्न…*
अहंकार सोडा समाज जोडा.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

वर्धा ,
आज पवनार येथे अखिल भारतीय तेली समाज संघटनेची आढावा बैठक संपन्न झाली असून अहंकार सोडा समाज जोडा या ब्रीद वाक्य नुसार ही आढावा बैठक घेण्यात आली यावेळी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तेली समाजातील सगळे बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे असे नागपूर विभागीय महासचिव अनिल बजाईत हे सगळ्यांशी बोलताना सांगत होते यात तेली समाजातील लोकांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळत नाही.आज ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केल्या जात आहे , ओबीसी वर्गाची दिशाभूल करण्यात येत आहे , शेतकऱ्यांनाही न्याय मिळत नाही , गरीब वर्गातील मुलांना शाळेत सवलती मिळत नाही , शेतमालाला भाव दिला जात नाही , नोकरी मध्ये सुद्धा आरक्षण दिले जात नाही, असे अनेक प्रश्‍न तेली समाजासमोर उभे आहे शाळा महाविद्यालय बंद असताना फी माफ होत नाही विद्यार्थ्याचे मोठे प्रश्न आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याची या समाजात प्रचंड अस्वस्थता दिसत आहे त्यामुळे तेली समाजातील बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे म्हणून “”अहंकार सोडा समाज जोडा “” असल्याचे बोलत होते पवनार येथील भागवत सेवा समितीचे अध्यक्ष नारायणरावजी गोमासे तसेच किशोर दादाजी हिवरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रामुख्याने उपस्थित मनोज तराळे नागपूर विभागीय संपर्कप्रमुख वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रवीणजी सेलोकर उपजिल्हा प्रमुख पंकज साकोरे , वर्धा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंदू वाघमारे , कलिंदी वानखेडे वर्धा महिला जिल्हाध्यक्ष , भावना वाडीभस्मे वर्धा कार्याध्यक्ष , देवळी तालुका अध्यक्ष दीपक घोडे , देवळी तालुका सचिव रवी कारोटकर , गणेश शेंडे पत्रकार , सेलू तालुका अध्यक्ष अर्चना घुगरे , सेलू तालुका प्रमुख रितेश पाहुणे , तालुका प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष किशोर सोनटक्के , सचिव लवेश भुजाडे , लक्ष्मण उमाटे , पवनार महिला अध्यक्ष विजया प्रे. पाहुणे उपाध्यक्ष अर्चना दि.वंजारी व इतर पदाधिकारी तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

)