भारतीय बौद्ध महासभा हिंगोली चे राहुल घोडके यांच्या वाढदिवसानिमीत्त बोधिवृक्ष रोपवाटीकाचे उदघाटन.
✒हिंगोली जिल्हा प्रतिनिधी✒
हिंगोली/वसमत,दि.05 जुलै:- हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव ता. वसमत येथे सोमवारला दुपारी12.00 वाजताच्या सुमारास राहुल घोडके जिल्हा उपाध्यक्ष – भारतीय बौद्ध महासभा, हिंगोली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “बोधिवृक्ष रोपवाटीका” चे रितसर उदघाटन करण्यात आले.
राहुल घोडके जिल्हा उपाध्यक्ष – भारतीय बौद्ध महासभा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दर वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यावर्षी बोधिवृक्ष रोपवाटीका उभारण्यात आली. बोधिवृक्ष रोपवाटीकाचे उदघाटन प्रसंगी तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांस अभिवादन करुन त्रिशरण – पंचशील ग्रहण करण्यात आले. त्या नंतर राहुल घोडके यांनी रोपवाटीका साठी जमीन, शेड आणि रोपासाठी लागणारी माती, पन्नी व पाणी उपलब्ध करुन दिल्या बदल आणि वाढदिवसाला पार्टी,दारु-मटन असे काही न करता एक चांगला उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतल्या बदल त्यांचा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा अंजनवाडाचे सरपंच किरण घोंगडे व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप रणवीर यांनी पुष्पहार व शाॕल देऊन जाहिर सन्मान केला. रोपवाटीका चे उदघाटन बोधिवृक्ष चळवळीचे वाहक दिनेश हनुमंते महाराष्ट्र राज्य मुख्यसंघटक – दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा प्रवक्ता तथा पार्डी बु. चे सरपंच प्रकाश मगरे यांनी केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे मराठा कमिटीचे पदाधिकारी आयु.दिनाजी खाडे यांनी सुत्रसंचलन केले, तर आभार संभाजी मोगले जिल्हा मुख्य सचिव-भारतीय बौद्ध महासभा, हिंगोली यांनी मानले.
बोधिवृक्ष चळवळच्या माध्यमातून जिल्ह्यात पाच हजार बोधिवृक्ष रोपन करण्यात येणार आहेत. या करिता बोधिवृक्षाचे रोप तयार करण्यासाठी सदर रोपवाटीका काम करणार आहे. या रोपवाटीकेत एका वर्षात किमान एक हजार रोपे तयार केले जातील येवढी क्षमता आहे.