हिंगणघाट येथे विद्युत बिल माफीसाठी आणि ओबीसींची जातिनिहाय जनगणनेसाठी कंदील भेट आंदोलन.हिंगणघाट येथे विद्युत बिल माफीसाठी आणि ओबीसींची जातिनिहाय जनगणनेसाठी कंदील भेट आंदोलन.

52

हिंगणघाट येथे विद्युत बिल माफीसाठी आणि ओबीसींची जातिनिहाय जनगणनेसाठी कंदील भेट आंदोलन.

हिंगणघाट येथे विद्युत बिल माफीसाठी आणि ओबीसींची जातिनिहाय जनगणनेसाठी कंदील भेट आंदोलन.
हिंगणघाट येथे विद्युत बिल माफीसाठी आणि ओबीसींची जातिनिहाय जनगणनेसाठी कंदील भेट आंदोलन.

 

             ✒️आशिष अंबादे✒️
              वर्धा जिल्हा प्रतिनिधी
                मिडिया वार्ता न्यूज

हिंगणघाट,दि.6 जुलै:- जनतेचे विज बिल माफ करण्यासाठी व 28 जून 2021 ला ओबीसींचे बंद केलेले आरक्षण पुर्ववत चालू करण्यासाठी ओबीसींची जातिनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे यासाठी बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी, युवा आघाडी व संलग्न संघटनांनी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांत आणि 358 तालुक्यांमध्ये एकाचवेळी कंदील भेट आंदोलन केले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तहसील मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कंदील भेट आंदोलनाचा मोर्चा कोरोना महामारीचा कहर लक्षात घेऊन शांततामय मार्गाने कलम 19(1)अ नुसार सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आणि मास्क बांधून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला.

या कंदिल आंदोलनामध्ये बीएमपीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय ढोकपांडे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कच्या हिंगणघाट तालुका अध्यक्षा कुंदाताई गोडघाटे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष दगडूजी मडावी, राष्ट्रीय सिकलिगर सिख मोर्चाचे वर्धा जिल्हाध्यक्ष साधूसिंग भादा, भारतीय बेरोजगार मोर्चाचे सुरज ताकसांडे, ओबीसी मोर्चाचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष गजानन वर्हाडे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे हिंगणघाट तालुका उपसंघटक संजय डोंगरे, इंद्रपाल वनकर, राजू शंभरकर, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे गजानन कोराम, अर्चना प्रभाकर सुटे, मयुरी पाटील, कांताबाई मडावी, प्रशांत वळतकर आणि सामाजिक कार्यकर्ता प्रज्योत लीहितकर, इंडियन लाॅयर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष एड. संदीप कांबळे, चंद्रहास्य कांबळे, महेंद्र वावरे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे गजानन माउसकर, मोरेश्वर झोडे उपस्थित होते तसेच या आंदोलनाचा मोर्चा बीएमपीचे जिल्हाध्यक्ष गेमदेव मस्के यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.