हिंगणघाट मोहता मिल कामगारांच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयवर विशाल मोर्चा.

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट,दि.5 जुलै:- कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील मोहता मिल कामगारांच्या उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला व निवेदन देवून चर्चा करण्यात आली.
हिंगणघाट येथील मोहता मिल कंपनी ही 135 वर्षं जुनी असुन हिंगणघाट व ग्रामीण भागातील जनतेचे संपूर्ण उदरनिर्वाह या मिलावर अवलंबून आहे. मोहता मिल संचालकानी अचानक मिल बंद केल्यामुळे कामगार आणि त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कामगाराचे वय हे 30 ते 40 च्या दरम्यान असुन रोजगाराच्या पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मागील अनेक महिण्याचे वेतन कामगाराना मिळाले नाही. जर संचालक मंडळास गिरणी बंद करावयाची असेल तर संपूर्ण कामगाराना कंपनी अक्ट नुसार व्हीआरस देण्यात यावे.
व प्रोत्साहन 10 लाख देण्यात यावे. मिल कामगारांना हक्काचा पैसा देण्यात यावा अन्यथा मिल कामगारासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. जर एखादा कामगाराने आर्थिक विवंचनेपाही आत्महत्या केली याची जबाबदारी कोण घेणार. अश्या प्रसंगी स्वतः मिल मालकास जबाबदार धरून व त्याचावर 302 नुसार गुन्हा करावा का? सदर मिलाची सोसायटी असून त्या सोसायटीचे रक्कम 36 लाख रूपये मिल मालकांकडे अजूननही जमा आहे तो पैसा सोसायटीकडे जमा करण्यात यावा, ईएसआयची रक्कम मिलमालकाने भरली नसल्यामुळे कामगारांना ईएसआयचे लाभ मिळणे बंद आहे. त्वरित मिल मालकाकडून ईएसआयच्या रक्कमेचा भरणा करण्यात यावा जर 8 दिवसांत या मिल कामगारांच्या मागणी मान्य नाही झाल्या तर या पेक्षा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा ईशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना दिलीप कहूरके, मनिष कांबळे, राजेश खानकूरे, प्रदीप माणिकपुरे, विलास ढोबळे, देवरावभाऊ साबळे, अरूण काळे, गुलाबराव पिपळशेंडे, अनिल तादूळकर, रत्नाकर कुंभारे, मधुकर जागडे, नितिन कानकाटे, जिवन उरकुडे व अन्य मिल कामगार व महिला उपस्थित होते..