*राजदंड पळवला म्हणून कामकाज थांबणार नाही ! भास्कर जाधवांचा रवी राणांवर निशाणा*

अभिजीत सकपाळ
भिवंडी प्रतिनिधी
9960096076
मिडीया वार्ता न्यूज भिवंडी, ठाणे
मुंबई। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजामध्ये विधानसभा तालिका अध्यक्षांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर थेट निवेदन देणारे आमदार रवी राणा यांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. आमदार रवी राणा हे आज (६ जुलै) शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा व्हावी असे निवेदन थेट अध्यक्षांना देण्याचा प्रयत्न करत होते. पण असे निवेदन थेट देता येत नाही. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चेच्या वेळी आपण सहभाग घ्यावा असेही भास्कर जाधव यांनी सांगितले. पण रवी राणा यांनी त्यावेळी राजदंड पळवला. पण राजदंड पळवला म्हणून कामकाज थांबणार नाही, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. स्टंटबाजीला फार महत्व देऊ नका असाही टोला भास्कर जाधव यांनी यावेळी लगावला. पण स्टंटबाजी करणाऱ्या रवी राणा यांना सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश भास्कर जाधव यांनी दिले. मार्शलला बोलावून भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना बाहेर काढले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा राजदंड पुन्हा सभागृहात आणण्यात आला.शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा असून त्यावेळी तुम्ही सहभागी व्हा असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांबाबतची भूमिका आणि स्टंटबाजी यांच्यातील फरक हा विधानसभा सदस्यांनी ओळखावा असेही जाधव म्हणाले. रवी राणा यांच्यासारख्या आमदारांचा हेतू हा चर्चा करायचा नाही, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे. पण त्यासाठी चर्चेचा वेगळा वेळ ठेवला आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले. त्यामुळे स्टंटबाजांकडे लक्ष देऊ नका असेही भास्कर जाधव यांनी यावेळी सुचवले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने अभिरुप विधानसभा भरवली !
भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील आजूबाजूलाच बसले होते. यावेळी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. यावेळी त्यांनी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला.