*तुम्ही आमचे बारा आमदार निलंबित केले, आता आम्ही तुमचे बारा वाजवल्या शिवाय राहणार नाही : प्रा.अतुल देशकर.* *विधिमंडळात 12 आमदारांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन.*

*तुम्ही आमचे बारा आमदार निलंबित केले, आता आम्ही तुमचे बारा वाजवल्या शिवाय राहणार नाही : प्रा.अतुल देशकर.*

*विधिमंडळात 12 आमदारांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन.*

*तुम्ही आमचे बारा आमदार निलंबित केले, आता आम्ही तुमचे बारा वाजवल्या शिवाय राहणार नाही : प्रा.अतुल देशकर.* *विधिमंडळात 12 आमदारांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन.*
*तुम्ही आमचे बारा आमदार निलंबित केले, आता आम्ही तुमचे बारा वाजवल्या शिवाय राहणार नाही : प्रा.अतुल देशकर.*
*विधिमंडळात 12 आमदारांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन.*

अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी प्रतिनिधी

ब्रम्हपुरी ६/७/२१ :

काल विधिमंडळात भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणले. या वेळी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या वतीने सभागृहात विविध मागण्यांसाठी सरकारचा व मंत्र्यांचा निषेध करण्यात आला. या प्रकारामुळे सूडाच्या भावनेतून महाविकास आघाडी सरकारने भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित केले.

ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीवरून सरकारने भाजपाच्या आमदारांचे निलंबन हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ आज ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

या आंदोलनात भाजपा जिल्हा महामंत्री तथा जि.प सदस्य कृष्णा सहारे, माजी जि.प सदस्य काशीनाथ पाटील थेरकर, जेष्ठ नेते प्राचार्य अरुण शेंडे, पं. स सभापती प्रा.रामलाल दोनाडकर, उपसभापती सुनीता ठवकर, नगर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, नगर महामंत्री मनोज भूपाल, कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, माजी सभापती तथा जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वंदनाताई शेंडे, जि.प सदस्या सौ.दीपाली मेश्राम, माजी सभापती प्रणाली मैंद, माजी सभापती रवी मेश्राम, माजी उपसभापती नामदेव लांजेवार सहभागी झाले होते.

माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांना धारेवर धरले. राज्याचे ओबीसी मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार निष्क्रिय मंत्री असल्याची टीका त्यांनी या वेळे केली. तुम्ही आमचे 12 आमदार निलंबित केले आता आम्ही तुमचे बारा वाजविल्या शिवाय राहणार नाही असे खडेबोल माजी आमदार प्रा.देशकर यांनी सरकारला सुनावले. या वेळी धानाला मिळालेला अर्धा बोनस, शेतकऱ्यांची न झालेली कर्जमाफी, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ न करण्याबाबत ही देशकर यांनी सरकारचा निषेध नोंदविला. या प्रसंगी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्षा रश्मी खानोरकर, भाजपा शहर उपाध्यक्ष विनायक दुपारे, पं. स सदस्या सौ.उर्मिला धोटे, पं.स सदस्य प्रकाश नन्नावरे, पं. स सदस्य विलास उरकुडे, सरपंच गजानन ढोरे, माजी नगरसेवक संजय बावनकुळे, माजी नगरसेविका अनघा दंडवते, माजी नगरसेविका डॉ.हेमलता नंदूरकर, राजेश्वर मगरे, प्रा.संजय लांबे, प्रा.अशोक सालोटकर, साकेत भानारकर, नानाजी गराडे, अशोक हटवार, अरविंद कुंभारे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, नगर महामंत्री रितेश दशमवार, महामंत्री स्वप्नील अलगदेवें, सचिव दत्तायेरावार, ओबीसी आघाडी शहर महामंत्री अमित रोकडे, भरत सावकार, महिला आघाडीच्या रेखा राऊत, चुमदेव जांभुळे, उपसरपंच राजकुमार कुत्तरमारे, गोगाव ग्रापं सदस्य बंटी गोंदोळे, मुनिश्वर सेठीये, दुधराज नंदेश्वर, मारोती थेरकर, राजू झुरमुरे, सुरेश बनपूरकर, अरुण भगत यांच्या सह भाजपा, युवा मोर्चा व महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.