जून अखेरचे तिमाही विवरणपत्रेऑनलाईन सादर करावे

48

जून अखेरचे तिमाही विवरणपत्रेऑनलाईन सादर करावे

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मो: 7350050548

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांना दर ३ महिन्यांनी ई-आर-१ सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा) १९५९ व नियमावली १९६० मधील कलम ५ (१) व ५ (२) नुसार सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी यापूर्वी संबंधितांना प्राप्त झालेला युझर आयडी व पासवर्ड टाकुन १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२ या तिमाही कालावधीचे ई-आर-१ माहे, जून- २०२२ अखेरपर्यंत Online सादर करणे आवश्यक आहे.

ई-आर-१ भरण्यासाठी www. mahaswayam. gov. in या वेबपोर्टलवर आपला Login ID व Password चा वापर करून Online भरण्याची कार्यवाही करावी. यामध्ये कसूर केल्यास १९५९ व १९६० मधील कलमान्वये कार्यवाही करण्यात येईल. तरी विहीत कालावधीमध्ये तिमाही विवरण Online पध्दतीने भरावे. सदर विवरणपत्रामध्ये माहिती भरतांना काही अडचण असल्यास ऑनलाईन User Manual चा ही वापर करता येईल अथवा कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०७२५२-२३१४९४ यावर संपर्क साधावा. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.✍️