मुबंई गोवा महामार्गवर अपघातात एक ठार तर दोन जण जखमी

51

मुबंई गोवा महामार्गावर अपघातात एक ठार तर दोन जण जखमी

सचिन पवार

माणगांव तालुका प्रतिनिधी

 मो: ८०८००९२३०१

माणगांव :- माणगांव तालुक्यातील मौजे तिलोरे गावच्या हद्दीत दिनांक ४ जुलै रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स व वैगणार कार मध्ये धडक होऊन एक ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना ४ जुलै रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की फिर्यादी अक्षय गोले, रा वनवशी ता दापोली याने आपल्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हल्स क्र एम एच ४८ सीबी ३५७७ ही दापोली वरून मुंबई बाजूकडे प्रवाशी घेऊन जात असताना माणगांव तालुक्यातील तिलोरे गावच्या हद्दीत आलं असता मुबंई बाजूकडून वैगणार कार ही गोवा बाजूकडे येत असताना आरोपी सुरेश परब गाडी क्र एम एच ४७ एन ३९१९ ही अति वेगाने चालवून हयगयीने रस्त्याच्या परस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक फिरून फिर्यादीच्या रॉंग साईड ला येऊन आडवी आल्याने फिर्यादीच्या गाडीला ठोकर लागून अपघात झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात वैगणार कार मध्ये मागे बसलेल्या साधना मेस्त्री यांना किरकोळ दुखापत झाली तर त्याच्या बाजूला बसलेले शशिकांत पांडुरंग पाचाळ हे जागीच ठार झाले या अपघात प्रकरणी आरोपी सुरेश परब याच्या विरोधी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर अस्मिता पाटील ह्या करीत आहेत.