नवनिर्वाचित प्रदेश युवक अध्यक्ष अभिषेक बकेवाड यांचा रायखोड येथे भव्य सत्कार

41

येणाऱ्या काळात गोल्ला गोलेवार यादव समाजाला मुख्य प्रवाहात आणणार- प्रदेशाध्यक्ष युवक आभिषेक बकेवाड

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

नांदेड – भोकर तालुक्यातील रायखोड येथे गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत लावली होती.

याप्रसंगी युवक प्रदेशाध्यक्ष अभिषेक बकेवाड,उबाठा गटाचे शिवसेना ता.प्रमुख संजयजी काईवाड,गो.गो.यादव हिमायतनगर शहर अध्यक्ष श्याम सेठ जक्कलवाड, युवा ता.अध्यक्ष हि.नगर लक्ष्मण भैरेवाड नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या रायखोड भव्य सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना बकेवाड म्हणाले की समाजातील प्रत्येक अडी अडचणी दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आता समाज बांधवांना एकत्र येऊन काम केलं तर समाजाचा विकास होईलच आणि समाज बांधवांनी सत्कार केल्याने माझ्यावरील विश्वास वाढल्याने दिसून आले माझा संपुर्ण वेळ हे समाजासाठी आहे तुमच्या मनातील समाजाबद्दल समस्या असतील तर माझ्या पर्यंत पोहोचा मी त्या सोडविण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेल, येणाऱ्या काळात प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून यादव समाजाला मुख्य प्रवास खेचून आणले पाहिजे महाराष्ट्र सह प्रत्येक जिल्ह्यात व तालुका स्तरावर यादव महासंघाचे युवा कार्यकारणी डिसेंबर पर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत समाजातील सर्व युवकांना कार्यकारणी मध्ये कार्य करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणार आहोत असे आश्वासन नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष युवक अभिषेकजी बकेवाड यांनी दिले आहे.

यावेळी – जिल्हा कार्याध्यक्ष रमेश रामपुलवार, जेष्ठ मार्गदर्शक बालाजी शैनेवाड, शाखा अध्यक्ष हांनमत पोपुलवाड व, सुनील कोईलवाड, गोविंद चिखलवाड पापुरलवार सर, पुंडलिक कोईलवाड, महेश पापुलवाड, शंकर कोईलवाड,बालाजी बयेवाड, बालाजी चिखलवाड,यादव आरकलवाड, मारोती गुजेवाड,हांनमत आरकलवाड, गणेश मॅकलवाड, बालाजी आरकलवाड,व ईतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.