मोहरमचा ताजा पोलादपूरमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन
सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर :- पोलादपूर पोलादपूर तालुक्यात मोहरमचा ताजा हा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील बोरज, कापडे, चरई, तसेच पोलादपूर शहरातील दोन मोहल्ल्यांतून रंगीत, कलात्मक आणि पारंपरिक ताज्यांची मिरवणूक काढण्यात आली. या ताज्यांची शहरातील मुख्य बाजारपेठेत एकत्रित मिरवणूक झाली आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचे विसर्जन करण्यात आले.
या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. मुस्लिम बांधवांकडून आपलेपणा व बांधिलकीचा भाव व्यक्त झाला.
उत्सव शांततेत आणि भावनिक वातावरणात पार पडला. मोहरमचा ताजा हा केवळ धार्मिक विधी न राहता, सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान व सहिष्णुतेचा संदेश देणारा सांस्कृतिक घटक म्हणून पुढे आला आहे.
या निमित्ताने पोलादपूर तालुका पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरला. पारंपरिक रीतिरिवाज, अनुशासन व उत्साह यांचा मिलाफ या मिरवणुकीत दिसून आला. मोहरमचा ताजा हा सर्व धर्मीय बांधवांना एकत्र आणणारा, सामाजिक सलोख्याचा आदर्श ठरलेला उत्सव ठरतो, हे या वर्षीच्या उत्सवातून पुन्हा अधोरेखित झाले. उत्सव पोलीस प्रशासन सहकार्य करून शांतता व सलोखा राखुन आंनदी पार पडला