गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे मोहरम निमित्त पोलीस व पालिका प्रशासनाची विशेष मोहीम.

गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे मोहरम निमित्त पोलीस व पालिका प्रशासनाची विशेष मोहीम.

इतर दिवशी ही अशीच उपाययोजना करावी! प्रेम नगर च्या नागरिकांची मांगणी.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे मोहरम च्या अनुषंगाने पोलीस व पालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिवस भर फेरीवाल्यांवर कारवाई चा बडगा उगरत प्रेम नगर मधे आज पूर्ण फेरीवाले बंद करण्यात आले.

आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या अवैध असलेल्या वाहनाना उचलून नेण्यात आले, अशा प्रकारे आज दोन्ही प्रशासनाकडून कुठलीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

संपूर्ण गोरेगांव प्रेम नगर ला पोलीस छावणीचे स्वरूप दिसण्यात आले. आज मोहरम च्या निमित्ताने संपूर्ण प्रेम नगर ने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आज तिथल्या नागरिकांना अनुभवायला मिळाले, अशीच परिस्थिती प्रेम नगर मधे रोज दिसली तर प्रेम नगर सुजलम सुफलाम नक्कीच दिसेल, अशी तिथल्या नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली होती.

सदर मोहरमचा जुलूस रात्री 8:30 निघून एस व्ही रोड कडे मार्गस्थ झाला. त्यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतानाचे चित्र दिसले. सदर जुलूस च्या वेळी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.