प्राथमिक शाळा सारळ येथे आषाढी एकादशी साजरी

प्राथमिक शाळा सारळ येथे आषाढी एकादशी साजरी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- जनता शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा सारळ येथे आज आषाढी एकादशी निमित्त प्राथमिक शाळा सारळ ते सारळ गावातील चव्हाटा इथपर्यंत वारीच्या आयोजन करण्यात आले . या वारीमध्ये पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळा सारळ चे सुमारे 200 विद्यार्थी सर्व शिक्षक , मोठ्या प्रमाणात पालक व ग्रामस्थ सहभागी होते . विठुरायाचा गजर करीत संपूर्ण सारळ गावात वारी फिरली .शाळेतील मुलांनी विठ्ठल , रखुमाई व वारकरी अशा छान वेशभूषा केल्या होत्या . सारळ गावातील चव्हाटा येथे मुलांनी ,मुख्याध्यापक मढवी सर व शाळेतील सर्व शिक्षक यांनी ‘अशी पंढरी पंढरी ‘हे गीत नृत्य करून सादर केले .याप्रसंगी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .अगदी भावपूर्ण वातावरणात आषाढी वारी साजरी झाली .