भोकरदन तालुक्यात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहवर्धक वातावरण साजरा.

✒गोपिनाथ मोरे ✒
भोकरदन तालुका प्रतिनिधी
9975153466
जालना/भोकरदन:- आज मोठ्या प्रमाणात मनुष्याने पृथ्वीवर पर्यावरणाची हानी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे भोकरदन तालुक्यांतील नांजा या ठिकाणी सोमवारला जिल्हा परिषद प्रशाला नांजा (दगडखिळा) येथे वृक्षारोपन करण्यात आले.
या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ञानेश्वर मोरे, जनार्धन, कैलास फुके, विठ्ठल शेवाळे, विलास गाडेकर, हिंमतराव मोरे, गजानन मोरे आणि गावातील नागरिक यांचा हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी प्रमुख व्यक्त्यानी वृक्षारोपण संबंधि गावातील नागरिकाना माहिती दिली. सर्वानी पुढे येऊन एक तरी वृक्ष लाऊन त्याचे संगोपन काळाची गरज आहे. वृक्षरोपण ही एक सामाजिक चळवळ बनली पाहिजे असे उद्द्गार काढले.