*मानकी येथे चोरट्यांचा धुमाकुळ, चार घरे फोडली,36 हजार पाचशे रूपयाचा मूद्देमाल लंपास*

✒साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मिडिया वार्ता न्यूज 7262025028
यवतमाळ : -वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मानकी गावात मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ माजवला असुन तब्बल चार घरे फोडली आहेत. तर एका घरातुन सोन्याच्या दागीन्यांसह रोख रक्कम मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज दि.५ ऑगस्टला पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
सविस्तर असे की, मौजा मानकी येथे गुरुवारी मध्ये रात्री १ ते २ वाजताचे सुमारास अदाजे दोन ते तिन चोरट्यांनी गावातील वार्ड क्र.३ मध्ये शालीक पुंड,विनोद काकडे,कोंडु चौधरी व महादेव नागपुरे यांच्या घराला लक्ष बनवुन घरफोडी केली.यावेळी विनोद काकडे,कोंडु चौधरी व महादेव नागपुरे यांच्या घरातुन चोरट्यांना खाली हात परतावे लागले परंतु शालीक पुंड यांच्या घरातील आलमारी फोडून,सोन्याची वस्तू नगदी रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे घर फोडी करण्याच्या अगोदर गावातुन बाहेर पडण्यासाठी जागो जागी तापाचे कुंपन कापुन जागा तयार केली. व नंतर घरांना लक्ष केले असावे.हा धुमाकुळ मध्यरात्री १ ते २ वाजताचे सुमारास माजवला असुन दोन ते तिन चोरट्यांचा समावेश असल्याचे दिसुन येत आहे.यावेळी चोरट्यांनी कपाटाच्या मोल्यवान वस्तू लंपास केल्याची तक्रार पूंड यांनी वणी पोलीसात रीतसर तक्रार दाखल केली अाहे,तक्रारीत 36 हजार 500 रूपयाची चोरी झाल्याचे नमूद केले अाहे,या वरून वणी पोलीसांनी अज्ञात अारोपी विरूद्ध कलम 380 अन्वये गून्हा नोंद करून पूढील तपास वणी पोलीस करीत अाहे,