मरारमेंढा येथे ‘सामाजिक सहकार्य जबाबदारी’ अंतर्गत शाळेला सँनिटायजर मशिन भेट* * *टॅग्स कलेक्टिव इंडिया प्रा. लि. तथा माऊली सर्विसेस नागपूर चा स्तुत्य उपक्रम*

*मरारमेंढा येथे ‘सामाजिक सहकार्य जबाबदारी’ अंतर्गत शाळेला सँनिटायजर मशिन भेट*
* *टॅग्स कलेक्टिव इंडिया प्रा. लि. तथा माऊली सर्विसेस नागपूर चा स्तुत्य उपक्रम*

मरारमेंढा येथे 'सामाजिक सहकार्य जबाबदारी' अंतर्गत शाळेला सँनिटायजर मशिन भेट* * *टॅग्स कलेक्टिव इंडिया प्रा. लि. तथा माऊली सर्विसेस नागपूर चा स्तुत्य उपक्रम*
मरारमेंढा येथे ‘सामाजिक सहकार्य जबाबदारी’ अंतर्गत शाळेला सँनिटायजर मशिन भेट*
* *टॅग्स कलेक्टिव इंडिया प्रा. लि. तथा माऊली सर्विसेस नागपूर चा स्तुत्य उपक्रम*

अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपुरी :-समाज माझा आहे. समाजाकडून आम्हाला जे काही मिळते त्याची अल्पशी परतफेड जरी करता आली तरी ती आम्ही करू’ या भावनेतून अनेक जिल्ह्यात टॅग्स कलेक्टिव इंडिया प्रा. लिमिटेड तथा माऊली सर्विसेस नागपूर हि कंपनी आपले सामाजिक दायित्व पार पाडीत आहे.
याच ‘सोशियल को-ऑपरेशन रिस्पाँसबिलिटी’ योजनेतंर्गत कंपनीने तालुक्यातील मरारमेंढा प्राथमिक शाळेला स्वयंचलित सेंसरयुक्त सँनिटायजर मशिन भेट दिली. याप्रसंगी माऊली सर्विसेस नागपूर चे संचालक प्रशांत माडेवार व चंद्रपूर जिल्हा समन्वयक कपिल मेरूगवार यांनी कंपनीचे सामाजिक जाणीवेबद्दलची ध्येयधोरणे तथा भविष्यकालीन योजना याबाबत माहिती दिली. भेटवस्तू समर्पण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार ब्रम्हपुरी विधानसभा श्री अतुलभाऊ देशकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती पं. स.ब्रम्हपुरी श्री नामदेवभाऊ लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते. अतूलभाऊ देशकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून कोविड महामारीची परिस्थिती व त्याअनुषंगाने टॅग्स कलेक्टिव इंडिया कंपनी तथा माऊली सर्विसेसच्या अशाप्रकारच्या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा केली. केंद्रप्रमुख खेड अरविंद साखरकर साहेब , नामदेवभाऊ लांजेवार , ग्रामपंचायत सदस्य मरारमेंढा रामभाऊ पिसे या सर्वांनी कंपनीच्या ग्रामीण क्षेत्रातील अशाप्रकारच्या उपक्रमाबाबत अभिनंदन केले.
शाळेची निवड तथा नियोजनासाठी कंपनीचे तालुका समन्वयक हेमंत धामेजा यांनी प्रयत्न केले. तसेच उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेशभाऊ पिसे , उपसरपंच गौतम सोनडवले , मुख्याध्यापक ए.आर. ठाकूर , सहाय्यक शिक्षक एन.सी.ठक्कर , शापोआ कर्मचारी सुधाकर रासेकर , रविंद्र नैताम यांनी प्रयत्न केले.