*भाजपाच्या छबू वैरागडे व खुशबू चौधरी अविरोध…..*
*मनपाची झोन सभापती निवडणूक.*

*मनपाची झोन सभापती निवडणूक.*
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
चंद्रपूर : -महानगर पालिका चंद्रपूरच्या झोन सभापतीपदी भाजपाच्या नगरसेविका छबुताई वैरागडे व खुशबू चौधरी यांची गुरुवार(5ऑगस्ट)ला मनपा सभागृहात झलेल्या विशेष सभेत अविरोध निवड झाल्याने,भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार ही निवडणूक घेण्यात आली.
नागपूर विभागीय आयुक्तांनी 2 ऑगस्ट ला जाहीर केल्याप्रमाणे पीठासीन अधिकारी,जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांच्या निदर्शनात ही निवडणूक घेण्यात आली.झोन क्र.01 साठी नगरसेविका छबुताई वैरागडे व झोन क्र 02 साठी नगरसेविका खुशबू चौधरी या दोघांचेच नामांकन असल्याने पीठासीन अधिकारी गुल्हाणे यांनी वैरागडे व चौधरी यांनी अविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.सकाळी 11 ते 2 च्या दरम्यान ही निवडणूक घेण्यात आली.
मागील 2 दिवसांपासून अनेकांची नावे चर्चेत असतांना माजी अर्थमंत्री, आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात झोन 01 साठी छबू वैरागडे,झोन 2 साठी खुशबू चौधरी तर झोन 03 साठी भाजपा चे नगरसेवक सोपान वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.झोन 03 साठी मात्र वायकर व विरोधी उमेदवारास समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीने निर्णय घेण्यात आला.यात वायकर यांना विजय मिळवता आला नाही.
झोन सभापती पदी विजयी वैरागडे व चौधरी यांचे माजी अर्थमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,भाजपा महानगर जिल्हाअध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,भाजपा जेष्ठनेते प्रमोद कडू, महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती रवी आसवानी,सभागृह नेते संदीप आवारी, भाजपा(श) संघटन मंत्री राजेंद्र गांधी ,कोषाध्यक्षप्रकाश धारणे, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,भाजपा नेते वसंता देशमुख,संदीप आगलावे, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लीवार,सोपान वायकर,युवानेते मयूर चाहरे, सुनील डोंगरे,सज्जाद अली,महेंद्र जुमळे, गणेश गेडाम,देवानंद वाढई,वासुदेव बेले,वंदना संतोषवार,राहुल पाल, यांचेसह सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी अभिनंदन केले आहे.