संगणक परिचालिका सौ प्राजक्ता कडु यांना CSC-SPV कंपनी ने कामावरून केले कमी, रायगड जिल्हा संगणक परिचालिका संघटणे चा जाहीर निषेध,उपोषणा चा इशारा.

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

रोहा: तालुक्यातील शेडसइ ग्रामपंचायत च्या संगणक परिचालिका सौ प्राजक्ता कडु राहणार गोफण येथील रहिवाशी आसुन त्या सन:2011 पासुन संगणक परिचालिका म्हणुन काम पाहत आसुन त्या गेले दोन वर्षां पासुन ग्रामपंचायत शेडसइ च्या निवडणुकीतुन सदस्या निवडून आल्या नंतर त्या उप सरपंच म्हणुन ही निवडुन आल्या व उप सरपंच पदा चा ही काम करत आसुन ते दोन ही पदां ची जबाबदारी ने काम करीत आहेत आसा त्यांचा म्हणणंं आहेे. त्याना कोणत्या ही प्रकार ची पूर्व सूचना न देता दि:25/07/2022,रोजी CSC-SPV कंपनी करुन कामावरून कमी करण्यात आला,सौ,कडु यांनी सदरील बाब पुर्णपणे चुकीची आसुन सदर च्या कंपनी करुन परिपत्रकाला केराची टोपली दाखविण्यात आली आसा उल्लेख निवेदनात आहें या गोष्टी चा रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटने च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला,

आज दि:05/08/2022,रोजी पासुनच रायगड जिल्ह्यातील संघटीत आसलेले सर्व संगणक परिचालकांनी सर्व प्रकार च्या कामांवर बहिष्कार टाकला आहे.

सौ प्राजक्ता कडु यांना तात्काळ कामावर घ्यावे अन्यथा बुधवार दि:10/08/2022,रोजी पंचायत समिती रोहा च्या कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल असे निवेदन  मा.गट विकास अधिकारी रोहा, मा.तहसीलदार रोहा,मा.तालुका व्यवस्थापक अपले सरकार सेवा केंद्र पंचायत समिती रोहा व मा.पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे रोहा यांना महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना रायगड ने दिला आसुन उपोषण करनार आसलेची गांभीर्याने नोंद घेऊन त्या वेळेस जर काही कायदा व सुव्यवस्थे चा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला CSC-SPV कंपनी जबाबदार राहील आसा इशाराच संघटने करुन देण्यात आला आहे.

तरी सदर च्या महिला या गेले 11वर्षा पासुन संगणक परिचालक पद व गेले दोन वर्षा पासुन ग्रामपंचायत शेडसइ चे उप सरपंच पद ह्या दोन ही पदावर काम करीत आसताना एका पदा वरुन कंपनी करुन कमी केले आसलेने पं स रोहा कार्यालय समोर उपोषणाचा इशाराच दिला आसलेने मा.गट विकास अधिकारी रोहा करुन काय कारवाई करण्यात येईल यावर पुर्ण रोहा तालुक्या चा लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here