भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय सजवले
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान
मो: 7350050548
वाशीम जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्राप्त माहितीनुसार तपशील याप्रकारे वर्षभर आंदोलने, मोर्च, निवेदने, मागण्यांसाठी ठिय्यांमुळे गजबजणारे वाशीम जिल्हाधिकारी कार्यालय भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मात्र चांगलेच नटले आहे. माणसांचा राबता कमी असला तरी कार्यालयात सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्याने शनिवारी एक आगळीच प्रसन्नता कार्यालयात पसरली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत कायम गजबजलेले असली तरी तिला एक शासकीय झालर असते. राजकीय नेते, कार्यकर्ते आणि विविध कारणांनी कार्यालयात येणारे सामान्य माणसं, फाईलचे गठ्ठे नेणारे शिपाई, कर्मचारी यांची धावपळमुळे या इमारतीचे वरांडे, परिसर गजबजलेला असतो. मात्र ठिकठिकाणी शोभेची रोपे, तसेच विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तिरंगा ध्वजाच्या रंगात केलेली विद्युत रोषणाई सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.