अखेर नागभिडच्या एसटी बसस्टाॅपचा प्रश्न मार्गी आ.कितीकूमार भांगडिया यांच्या कामाला यश

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

9403321731

नागभिड: मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली नागभीड येथील जनतेची बस स्थानकाची मागणीचा सतत पाठपुरावा करीत चिमूर विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष म्हणून ख्याती असलेले कर्तव्यदक्ष आमदार कितीकूमार भांगडिया यांनी अखेर नागभीड जनतेची मागणी विचारात घेऊन नागभीड बस स्थानकांच्या बांधकामासाठी शासनाकडून ६ कोटीची निधी मंजूर करून दिली. एवढेच नाही तर कामाला गती देण्यासाठी नागभीड भाजपा पदाधिकारी व व्यापारी मंडळी यांची एक टीम इंजिनिअरच्या उपस्थितीत स्थानकांच्या प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली गेली.

 प्रत्यक्ष भेट देताना गणेश तर्वेकर माजी उपाध्यक्ष न.प., अवेश पठाण सभापती कृषी बाजार समिती,सचिन आकुलवार माजी बांधकाम सभापती शिरीष वानखेडे मा,नगरसेवक ,गुलजार धम्मानी व्यापारी संघटना अध्यक्ष ,विजय काबरा,अतुल चील्लुरे,गोपाल गिर्हेपुंजे,शुभम चील्लुरे,हेमंत नन्नावरे,सुमित वाधवानी व अन्य भाजप कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here