जोगेश्वरीतील वाहतूक कोंडीबाबत शिवसैनिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले निवेदन

पूनम पाटगावे

जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी

मो. नं. – ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नेस्को या प्रदर्शन केंद्रात सातत्याने विविध कंपन्यातर्फे मोठी प्रदर्शने भरवण्यात येतात. या प्रदर्शन केंद्राला मुंबईबरोबरच महाराष्ट्राच्या विविध भागातील तसेच देश विदेशातील उद्योजक मोठ्या प्रमाणात भेट देतात. अनेक उद्योजक तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी येणारे स्वतःच्या गाडीतून या ठिकाणी येत असल्याने येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेकवेळा तर प्रदर्शन केंद्रात वाहने उभी करण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने वाहने सर्व्हिस रोडवर तसेच पश्चिम दृतगती महामार्गांवर उभी केलेली दिसून येत येत असल्याची तक्रार येथून प्रवास करणारे वाहचालक तसेच रहिवासी यांनी आमदार श्री. रवींद्र वायकर यांच्याकडे केली.

 त्यातच या ठिकाणी मेट्रो ६ व ७ चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाला लागणारी यंत्रसामुग्री व अनेक अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत. त्यातच नेस्को केंद्राला भेट देणाऱ्या वाहनांची यात भर पडत असल्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, जेष्ठ नागरिक आणि रुग्णवाहीका यांना इच्छितस्तळी वेळेवर पोहचता येत नाही. या कोंडीमुळे रुग्णाला आपला प्राणही गमवावा लागण्याची शक्यता आहे. तसेच येथील कोंडीमुळे इंधन व पैशाचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच ओबेरॉय इंटरनॅशनल हायस्कूल मुळे जेव्हीएलआर या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्यामुळे प्रवासी हैराण आहेत.

सदर वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता आमदार श्री. रवींद्र वायकर यांच्या सूचनेनुसार शिवसैनिकांनी वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस राजेश नंदिमठ, वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक बनकर व अशोक घुगे यांची भेट घेऊन पश्चिम दृतगती महामार्ग व जेव्हिएलआर वरील होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करून निवेदन सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here