ग्रामीण भागातील स्वच्छतेकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गजानन बानोरे यांचे विधान 

50

ग्रामीण भागातील स्वच्छतेकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गजानन बानोरे यांचे विधान 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 7350050548

तालुक्याचे मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गजानन बानोरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिलेली माहिती याप्रकारे ग्रामीन भागातील स्वच्छतेकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामीण भागामध्ये गावालगत, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाला तडे गेले आहे. जिल्हा स्तरावरील हागणदारी मुक्ती कार्यक्रम प्रखरतेने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी निधी दिला जातो. गाव खेड्यामध्ये स्वच्छता वार्तापत्र राखण्यासाठी, नागरिकांचे निकोप आरोग्य राखण्यासाठी विविध योजनेअंतर्गत जिल्हा ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणावर स्तरावरून उपाय योजना केल्या जातात. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान दिले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हा स्तरावरील भरारी पथके सक्रिय करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या बाबीसाठी शासनाचा निधी मात्र मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. स्थानिक प्रशासनाकडून स्वच्छता अभियानाचे व हागणदारी मुक्तीचे बोर्ड लावण्या व्यतिरिक्त प्रशासनाकडून काहीच हालचाली होत नसल्याने शासनाच्या स्वच्छता अभियानाला तडे गेल्याचे दिसून येत आहे. स्थानिक प्रशासन कागदोपत्री घोडे नाचवून आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. अनेक कुटुंबाकडे शौचालय नसल्याने महिलांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येते. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते. यासाठी स्थानिक प्रशासनाने किमान महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधून कुचंबणा दूर करावी तरच शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव, शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. तसेच जिल्हास्तरावरून हागनदारी मुक्तीची पथके गाव खेड्यामध्ये सक्रिय झाल्याशिवाय व स्थानिक प्रशासनाने उपायोजना केल्या शिवाय, स्वच्छता अभियान यशस्वी होणार नाही.