सूतगिरणी कामगारांना ५० कोटींचे सानुग्रह अनुदान

सूतगिरणी कामगारांना ५० कोटींचे सानुग्रह अनुदान

 

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.
9096817953

नागपूर.उमरेड मार्गावरील नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी मर्या. येथील कामगारांना विशेष बाब म्हणून ५० कोटींचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी कामगारांच्या ३१ मार्च २००८ पर्यंत पगार व इतर देयके देण्याबाबत आ. प्रवीण दटके यांनी मागणीनुसार १३ जुलै २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आणि माजी आमदार विकास कुंभारे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. मात्र आचारसंहितेच्या कारणामुळे निर्णय घेण्यात आला नव्हता. नागपूर सहकारी सूतगिरणीचे कामगार आणि वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी यांच्या १३ ऑक्टोबर २००८ आणि २६ जून २०१६ रोजी बैठका झाल्या परंतु कामगारांचे वेतन आणि आर्थिक लाभ देण्याला वित्त विभागाची परवानगी मिळत नव्हती.

प्रवीण दटके यांनी हा विषय विधिमंडळ अधिवेशनाच्या माध्यमातून तसेच बैठकांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मार्गी लागला असून नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या कर्मचार्‍यांना ५० कोटी रुपयांचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस मानले आभारसूतगिरणी spinning mill मधील ११२४ पैकी ६८५ कामगारांची संमती घेऊन ६२ कोटी रुपयांची देयके देण्याकरिता सूतगिरणीची जमीन १७७ कोटी रुपयांना विकण्यात आली ,परंतु कामगारांचे ६२ कोटी देयके न देता केवळ १० कोटी देण्याचा निर्णय ५ मार्च २०१९ रोजी घेण्यात आला होता. उर्वरित ५० कोटी रुपये देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व कॅबिनेटचे आभार मानले आहे….