अलिबागच्या विठ्ठल मंदिरात पवित्रोपना एकादशीनिमित्त ह.भ.प. कलाताई पाटील यांचे ‘तुलसी आख्यान’ कीर्तन

अलिबागच्या विठ्ठल मंदिरात पवित्रोपना एकादशीनिमित्त ह.भ.प. कलाताई पाटील यांचे ‘तुलसी आख्यान’ कीर्तन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात सुरू असलेल्या पाच दिवसीय श्रावण कीर्तन महोत्सवात पवित्रोपना एकादशीच्या शुभ मुहूर्तावर ह.भ.प. कलाताई पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. ‘तुलसी आख्यान’ या अत्यंत दुर्मिळ विषयावरील त्यांच्या निरूपणाने भाविक भक्तीरसात तल्लीन झाले.
कलाताई पाटील यांनी निरूपणासाठी ‘नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी’ ही तुलसी आरती घेतली होती. त्यांच्या रसाळ वाणीतून उलगडलेले हे आख्यान ऐकण्याचा आनंद श्रोत्यांना मिळाला. याप्रसंगी त्यांना संवादिनीवर ह.भ.प. संजय बुवा रावळे आणि तबल्यावर श्री अविनाश रिसबुड यांनी उत्तम साथ दिली.
हा पाच दिवसांचा कीर्तन महोत्सव ह.भ.प. महेश्वर बुवा देशमुख, ह.भ.प. क्रमवंत बुवा आणि इतर विठ्ठल भक्तांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी अलिबाग येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. विशेष म्हणजे, या सर्व कीर्तनकारांना ह.भ.प. सोमण बुवा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अलिबागच्या धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरणात या महोत्सवामुळे अधिकच भर पडली आहे.