चित्रलेखा पाटील यांच्या तर्फे बांधण येथे मुलींना सायकलींचे वाटप
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील बांधण येथे ‘सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे’ या उपक्रमांतर्गत शालेय मुलींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करतांना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, संपूर्ण खारेपाटामध्ये स्वर्गीय नारायण पाटील, स्वर्गीय प्रभाकर पाटील, स्वर्गीय दत्ता पाटील यांनी विकासाची अनेक कामे केली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांची पुढची पिढी काम करत आहोत. त्यामुळे जनतेच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत आमच्यापर्यंत पोहोचवा किंवा आम्हाला प्रत्यक्ष भेटून आपल्या समस्या सांगा, आम्ही आपली सामाजिक बांधिलकी समजून घेवून नक्की मदत करू असा आत्मविश्वास दिला. शेतकरी कामगार पक्षाने खऱ्या अर्थाने या विभागाचा विकास केला त्या या लाल झेंड्याची सर्वांनी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. शेतकरी कामगार पक्षात सर्वसामान्यांचा पक्ष आहे तो सदैव तुमच्या पाठीशी राहील असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी बोलताना दिला. सायकल वाटप कार्यक्रमाप्रसंगी अनेक मुलींच्या चेहऱ्यावर सायकल मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. सदरचा कार्यक्रम बांधण येथील प्रतिज्ञा युवक क्रीडा मंडळाच्या व्यायाम शाळा प्रांगणात घेण्यात आला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे के. डी म्हात्रे ,अनंत भिंगे , महेंद्र पाटील, वसंत म्हात्रे, संदेश पवार, आनंद नाईक, अनंत नवरे, मा. सरपंच विजय पाटील, दिनेश पाटील, हरी जाधव, प्रभाकर भिंगे, कुणाल भिंगे, परशुराम पाटील, प्रकाश म्हात्रे, अंबरनाथ पाटील, अनिल पाटील, मो. रा. म्हात्रे, बाळाराम दांडेकर, मोहन मंचुके, राजेंद्र म्हात्रे आदि बहुसंख्य कार्यकर्ते महिलावर्ग कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शेकाप कार्यकर्ते के. डी. म्हात्रे व राजेंद्र पाटील व येथील कार्यकर्त्यांनी केले.