माहूर येथे नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
आदित्य खंदारे
माहूर प्रतिनिधी
7350030243
नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) उत्सव व परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने माहूरगडावरील श्री दत्तात्रेय संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) परिक्रमा पंचकोशी वेढा यात्रा दिनांक ८ रोज शुक्रवार दुपारी श्री दत्तात्रेय संस्थान शिखर माहूरगड येथून ४ वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक ९ रोजी परत येईल.श्रावण कृष्णपक्ष प्रतिपदा काकडआरतीने समाप्ती होईल अखंड दत्त नाम सप्ताहाची समाप्ती सकाळी सहा वाजता (सूर्योदय) १० रोजी होईल.सर्वतिर्थ येवून स्नान करून श्री दत्तात्रेय शिखर येथील दत्त प्रभुचे दर्शन घेऊन त्या ठिकाणावरून परिक्रमेला सुरुवात होईल. कमंडलू कुंड काळेपाणी काळेश्वर महादेव,अनमाळ महादेव,सयामाता, गरुडगंगा, मोवाळ तळ, विष्णुकवी मठ ,(विधांती) झंपटनाथ,कालभैरव माहूर, मारोती मंदिर, कपिलेश्वर मंदिर,सोनापीर, कवठापीर, पांडवलेणी ,भिमतिर्थ, आनंद मठ, पुरुषोत्तम भारती, चंचल भारती (चहापाणी करीता) बद्रिका आश्रम (देवदेवेश्वरीच्या खालून जुना वझरा रस्ता) महादेव,कैलास टेकडी (जुना कैलास पायथा) शेख फरीद, वझरा मारोती, ग्रामदेवता (दत्तमांजरी वाडा) अत्रीऋषी कुंड, अनुसया माता,सर्वतिर्थ दत्तशिखर येथे परिक्रमेची समाप्ती होईल.