*करोनाबाधित रुग्णाच्या उपचारास विलंब झाला; नातेवाइकांचा डॉक्टरवर हल्ला*

52

*नागपुर बिरो चीफ प्रशांत जगताप*
माघिल अनेक दिवसापासून डॉक्टर आणी हॉस्पिटल द्वारा कोरोना लागण झालेल्या रुग्णांची अनेक प्रकारे लूटीची प्रकरणे समोर येत आहे. कुठे कुठे उपचार वेळेवर होत नसल्याचा तक्रारीही पुढे येत आहे. खाली बेड असुन ही रुग्णाना मीळत नसल्याची ओरड दिसून येते. त्यामुळे रुग्णाचा नातेवाईकांचा पारा चढल्याचा अनेक घटना घडत आहे. अशीच एक घटना नागपुरच्या कोराडी मार्गावरील कुणाल हॉस्पिटल येते घडली.
उपचारास विलंब होत असल्याचा आरोप करीत करोनाबाधित रुग्णाच्या दोन नातेवाइकांनी कोराडी मार्गावरील कुणाल हॉस्पिटलच्या डॉक्टरवर हल्ला करुन तोडफोड केली.
उपचारास विलंब होत असल्याचा आरोप करीत करोनाबाधित रुग्णाच्या दोन नातेवाइकांनी कोराडी मार्गावरील कुणाल हॉस्पिटलच्या डॉक्टरवर हल्ला करुन तोडफोड केली. ही घटना ३१ ऑगस्टला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. डॉ. रवी श्याम सुर्यवंशी (वय ३६, रा. वंजारीनगर, अजनी), असे डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. रवी यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी करोनाबाधित रुग्णाच्या दोन नातेवाइकांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाबाधित रुग्ण गंजीपेठ येथील रहिवासी आहे. ३१ ऑगस्टला त्याला करोनाचा असल्याचे निदान झाले. नातेवाइकांनी त्याला कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारासाठी दोन लाख रुपयेही जमा केला.
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर रुग्णावर उपचारास विलंब होत असल्याने नातेवाइकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. डॉ. रवी हे नातेवाइकांची समजूत काढत असताना, दोन नातेवाइकांनी त्यांना शिवीगाळ केली. एका नातेवाइकाने हातातील काचेची बाटली फोडून रवी यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पैसे परत घेतले. रुग्णाला घेऊन नातेवाइक कारने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. डॉ. रवी यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.