*बीजेपी ला राम राम ठोकून अदित्य भाके नी केला युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश*

*कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906*
*राजुरा* :-भविष्यात होणाऱ्या राजुरा नगर परिषद व राजुरा विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्या समोर ठेऊन राजुरा शहर व ग्रामीण भागातील तरुण पिढी शेतकरी, बेरोजगार, मजदुर वर्ग सूरज भाऊ ठाकरे यांच्या वरील असलेलं प्रेम व विश्वासामुळे प्रवेश करत आहे.
गेल्या दोन तीन महिन्यात विविध पक्षातील नाराज लोकांनी तसेच तरुणांनी, महिलांनी पक्षात प्रवेश केला आणि अजून बरे तरुण,तरुणी व महिला व मजदुर पक्षात येण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रात आघाडी सरकार आले म्हणून बऱ्याच युवा वर्गातील तरुणांनी राष्ट्रीय पक्षात प्रवेश केले पण तिथे कुठल्याही प्रकारचे काम होत नाही असे दिसून येताच बऱ्याच तरुणांनी लोकांनी तो पक्ष सोडून युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला…
आज दिनांक ०५/०९/२०२१ ला अदित्य भाके यांनी युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांचा नेतृत्वात युवा स्वाभिमान पार्टी मध्ये प्रवेश घेतला, त्यावेळी चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख व जिल्हा कार्यालय प्रमुख राहुल भाऊ चौहान, राजुरा सोशल मीडिया प्रमुख निखिल बजाईत, तालुका समन्वयक आशिष यमनुरवार, शहर उपाध्यक्ष अमोल ताठे, भूपेश साठोने, अजवान टाक,तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक अब्दुल शोएब शेख व बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…