पिंपळगाव (हरे) राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या हस्ते आयुश मंत्रालयाच्या माध्यमातुन आयुर्वेदिक औषधी चे वाटप

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067
.राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधी वितरण.पिंपळगाव हरे येथील ग्रामस्थांना पंचायत समिती सदस्य चिरंजीव परेश पाटील पत्रकार राजू ठाकुर पत्रकार राजू निकम यांच्या हस्ते,संस्थेच्या माध्यमातून विविध आजारांची आयुश मंत्रालयाच्या माध्यमातून 48 लोकांना आयुर्वेदिक औषधी वितरण करण्यात आली. त्यात शुगर, बीपी, थायराइड, हृदयविकार, वजन वाढवणे, वजन कमी करणे, रोग प्रतिकारक्षमता वाढवणे, वंध्यत्व, त्वचा विकार, नेत्र विकार, किडनी स्टोन, सांधेदुखी, केस गळणे, अशा 17 प्रकारच्या आजारांवर मोफत औषधी वितरण करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास लोहार यांनी गरजू आणि विविध आजारांना वैतागलेल्या लोकांनी औषध हवे असल्यास संपर्क करावा असे आव्हान केले.कुरियार खर्च सोडता आजार पूर्ण पने बरा होईपर्यंत मोफत दिले जाईल.सचिव सुनील लोहार,संतोष गोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.