पतीच्या, वडिलांच्या स्मृतिदिनी केले वृक्षारोपण —विविध ठिकाणी लावली 50 वृक्ष.. -दरवर्षी राबवले जातात विविध सामाजिक उपक्रम

53

पतीच्या, वडिलांच्या स्मृतिदिनी केले वृक्षारोपण

—विविध ठिकाणी लावली 50 वृक्ष..
-दरवर्षी राबवले जातात विविध सामाजिक उपक्रम

पतीच्या, वडिलांच्या स्मृतिदिनी केले वृक्षारोपण ---विविध ठिकाणी लावली 50 वृक्ष.. -दरवर्षी राबवले जातात विविध सामाजिक उपक्रम

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभीड —-येथील जनमानसात ठसा उमटवलेले, भारतीय जनता पार्टी च्या सुरवातीच्या काळात मेहनत घेऊन नागभीड तालुक्या मध्ये पक्षाचा जनाधार वाढविण्याकरिता कष्ट उचलणारे, अनेक गोर गरिब लोकांना पक्षा सोबत जोडून राजकारण आणि समाजकारण करणारे लोकनेते दिवगंत भाजपा नेते स्व.ओंकारजी निनावे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी सुद्धा त्यांच्या पत्नी श्रीमती नीता ओंकार निनावे, मुलगी मृणालिनी निनावे-(लिपरे ),जावई सुयोग लिपरे, मुलगा तुषार निनावे, स्नुषा प्राची तुषार निनावे यांनी सामाजिक बांधिलकी राखत पंचायत समिती परिसर नागभीड, जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव,नवखळा, शिवनगर, स्मशानभूमी परिसर नागभीड, शिवटेकडी परिसर नागभीड,सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड,ट्वीकल इंग्लिश स्कुल नागभीड इत्यादी ठिकाणी आंबा,वड,गुलमोहर,पाम,कडुनिंब,इत्यादींची झाडे लावली..
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गट विकास अधिकारी खोचरे मॅडम,भाजपा जिल्हा महामंत्री व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, माजी नगरसेवक दिनेश गावंडे, सिनेट सदस्य श्री. अजयजी काबरा, मॉर्निंग वॉक संघटनेचे अध्यक्ष निमझे ,झेप निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, सेवानिवृत्त शिक्षक , महादेव ठाकरे, अवार्ड चे गुणवंत वैध, शिक्षक संतोश आंबोरकर, श्रीरामजी समर्थ, रवींद्रजी जांभूळे, देवेंद्रजी राहुड, पियूष राहूड, सरस्वती ज्ञान मंदिर चे मुख्याध्यापक गोकुल पानसे आणि इतर जी. प. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद इत्यादींची उपस्थिती होती.