आज स्पर्धा परिक्षेशिवाय तरणोपाय नाही : पी.एस.आय. राहूल गंदे .

46

आज स्पर्धा परिक्षेशिवाय तरणोपाय नाही : पी.एस.आय. राहूल गंदे .

आज स्पर्धा परिक्षेशिवाय तरणोपाय नाही : पी.एस.आय. राहूल गंदे .

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀

मालेगांव – आजच्या धकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेशिवाय तरणोपाय नाही असे उद्गार मालेगावं पोलीस स्टेशनचे पी .एस.आय. राहूल गंदे यांनी काढले . ते रामराव झनक कला व वाणिज्य महाविद्यालय मालेगांव येथे शिक्षकदिन अर्थातच डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून रासेयो तथा संघर्ष गणेश मंडळ शिक्षक कॉलनी मालेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .
विद्यार्थ्यांनी अभ्यासूवृती, मेहनत , जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची पराकाष्टा करून स्पर्धा परिक्षेत चमक दाखवून यशोशिखर गाठून स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव रोशन करण्याचे आव्हान त्यांनी केले .स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतची सर्व पुस्तके बारकाईने वाचने तथा दररोज नियमित वर्तमानपत्रे चाळून त्याचे दैनंदिन टाचन काढण्याचा मुलमंत्र त्यांनी रासेयो स्वयंसेवकांना दिला .पी.एस.आय. , एम.पी.एस.सी, यु . पी . एस . सी. , आय.ए.एस. इत्यादी वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले . अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मुरलीधर पवार म्हणाले की , डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार स्विकारुन अभ्यासूवृत्ती जोपासून व स्पर्धा परिक्षेची कास धरून विद्यार्थ्यांनी आपला जीवन मार्ग निवडावा . त्यासाठी नियमित तासीका करून अभ्यासात सातत्य ठेवून प्रथम चांगला गुणांनी पदवी प्राप्त करण्याचा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला . प्रास्ताविकातून रासेयो महिला कार्यक्रमाधिकारी प्रा .डॉ. लता जावळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा .डॉ. भीमराव जांभरुणकर यांनी केले. आभार प्रदर्शन संघर्ष गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ .महेश घुगे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाला मालेगाव पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल तांबारे सर , प्रा. भरत आव्हाळे, प्रा.वसंत आरु , प्रा . डॉ.संजय ताजने, प्रा.डॉ .दिपक जमदाडे, दत्ता पोफळे , ऋषिकेश सारसकर, अनिकेत सारसकर , सुनील मुंदडा , गोपाल अडकिले तथा रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयात शिक्षक दिन हा स्वयंशासन दिवस म्हणून विद्यार्थ्यांच्या वतीने साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून बीए फर्स्ट इयर व बीकॉम फर्स्ट इयर च्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.✍