पोलीस असल्याचं सांगून वृद्धाचे सोने पळविले !
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀
रिसोड शहरामधील वाशिम ते रिसोड रस्त्यावर असणाऱ्या साबु लेआउट समोर रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील हल्ली मुक्काम शिवाजी नगर येथील एका वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांचा हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना घडली. रिसोड शहरातील शिवाजी नगर भागात राहणारे भाऊराव साहेबराव खडसे हे वाशिम महामार्गाने रिसोड शहरात पायी जात असतांना एका मोटारसायकल वर आलेल्या तिघांनी पोलीस असल्याचं सांगून त्यांच्या हातातील सुमारे ७० हजार सोने लंपास
घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
किंमतीच्या दोन अंगठ्या काढून पोबारा केला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून रिसोड पोलीस लुटारूचा शोध घेत आहेत. भर दिवसा वृद्धाला लुटल्याने रिसोड शहरातील
अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये चोरीचे प्रमाण वाढलं आहे मागील आठवड्यामध्ये पोस्ट ऑफिस मधील तिजोरी व तसेच इतरही अनेक घटना वाढत चालल्या असून यावर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचे आहे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी यावेळी खडसे यांनी केली आहे भर दिवसा अशा घटना घडत असल्याकारणाने रिसोड शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्री व दिवसा पेट्रोलिंग करून अशा घटना कशा कमी करता येईल यावर लक्ष देणे गरजेचे आहे असे मागणी शहरातील
नागरिकांमध्ये भिती पसरली असून गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने रिसोड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे राहले आहे. गेल्या अनेक दिवसापासून रिसोड पोलीस स्टेशन नागरिक करीत आहे.✍