सावर्डे शाळा मुख्याध्यापक श्री संतोष बोंद्रे सर यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

सुनिल जाबर

जव्हार प्रतिनिधी

 सावर्डे शाळा मोखाड्या तालुक्यातील अतिषय दुर्गम शाळा असून या ठिकाणी गावात २०१९ पर्यन्त जाण्यासाठी रस्ता नव्हता सावर्डे शाळा येथे पहिली ते पाचवी पट ४२ असून येथील एक शिक्षक असून ग्रामस्थ मित्र, संस्था मार्फत शाळा इमारतीचे किचन सेड ,टॉयलेट याचे नूतनीकरण करून बाह्य रंग-अंतरंग सुशोभित केली ,तसेच मार्च २०२३ मध्ये वाचन लेखन प्रकल्प राबवताना राबवताना उपसभापती मा .प्रदीप वाघ साहेब बिडीओ जाधव साहेब यांनी कौतुक केले, तसेच शाळा मार्च २०२२ मध्ये आयएसओ होण्याचे मानांकन मिळवले.

तसेच सामाजिक बांधिलकी राबवत असताना मोखाडा तालुक्यातील महिलांचा डोक्यावरील हंडा खांद्यावर आनण्यासाठी ३०० वॉटर व्हील व मोखाडया तालुक्यातील दहा शाळांना स्मार्ट टीव्ही माहुली संस्थे कडून मिळवून दिली .केंद्रात मुलीचा वाढदिवस साधा पद्धतीने साजरा करत चार शालेना शैक्षणिक साहित्य वाटप केले .तसेच चार शाळेना लॅबरी पुस्तके मिळवून दिले .एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना हॉटेल सारखे जेवण करता यावे या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान पादीर,व ग्रामस्थांना सांगत मध्यान्ह भोजनासाठी एक शेड बांधण्याचे काम सुरू झाले आहे.

ह्या सर्व शैक्षणिक व सामाजिक बाबींचा विचार करून सावर्डे मुख्याध्यापक श्री संतोष बोंद्रे सर यांना २०२३ – २४ तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here