शिक्षक दिनानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र च्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय मोखाडातील शिक्षकांचा सत्कार…
सुनिल जाबर
जव्हार प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये शिक्षण दिनानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र’च्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार दिनांक ५ सप्टेंबर रोजी करण्यात आला .शिक्षक हा समाजाला परिवर्तनाकडे नेणारा दुवा आहे, शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी याचे लेखणी व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
त्या ठिकाणी उपस्थित मा. तुषार चौधरी(व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा मोखाडा) व त्यांचे सहकारी श्री. भरत तुंगार,श्री. युवराज खरपडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर ,उपप्राचार्य प्रा. एस. ई. सैंदनशिव, प्रा.एस. जी. मेंगाळ, कला शाखा प्रमुख प्रा. डॉ. एस. एच. जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. एस. आर. व्हनडे व प्रा.डॉ. वाय. एच. उलवेकर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते त्यांनी त्याठिकाणी असलेल्या सर्व शिक्षकांचे स्वागत केले. व हा सन्मान सर्वांनी आनंदाने स्वीकारला. व महाविद्यालयाने बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे आभार व्यक्त केले.