तेलंगणात कत्तलीसाठी जाणारी जनावरे एटापल्ली वनविभाग नाक्यावर पकडली…

मारोती काबंऴे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मों.नं.9405720593

एटापल्ली: तेलंगाणा राज्यात कत्तलीसाठी जाणारी 13 जनावरे (गोवंश) आधार फाउंडेशन एटापल्ली व राजमुद्रा फाउंडेशन एटापल्लीच्या कार्यकर्त्यांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास वनविभाग नाका एटापल्ली येथे पिकअप वाहनासह पकडण्यात आली.

त्या नंतर एटापल्ली पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी तातकाऴ वाहनासह जनावरे ताब्यात घेतली.

गाडी ला नंबर प्लेट नसल्याने आधार फाउंडेशन व राजमुद्रा फाउंडेशन ला माहिती मिळाली व त्या आधारे त्यांना पकडण्यात आले.

आधार फाउंडेशन एटापल्ली व राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली चे कार्यकर्त्यांनी जनावरासह गाडी पकडले 

दोघे पोलिसांचा ताब्यात,13 जनावरांची सुटका*

वनविभाग नाका येथे सापळा रचून पिकअप वाहनाला अडवण्यात आले व तपासणी केली असता वाहनात गोवंश आढळून आले.त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली.त्यानुसार पोलिसांनी जनावरांसह वाहन त्याब्यात घेतले.या प्रकरणी १) तापास सतीश बिश्वास रा.कृष्णा नगर,जनकापुर जिल्हा कांकेर छत्तीसगड,२) सुजित तपन बासर रा.कृष्णा नगर,जनकापुर जिल्हा कांकेर छत्तीसगड दोन्ही आरोपी पोलिसांचा ताब्यात असून अपराध क्रमांक ६३/२०२३ कलम ५,६,९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ व ११ (१)(क)(घ)(ड) भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागण्याबद्दलचा प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौमातांना जिवनगट्टा येथील कोंडवाडा मध्ये दाखल करण्यात आलेले असून एकूण मुद्देमाल गोवंश किंमत ६५ हजार रुपये व महिंद्रा पिकअप अंदाजे किंमत तीन लाख रुपये जप्त करण्यात आला.

महेंद्र सुल्वावार,संपत पैडाकुलवार,रोशन सोनी,मनिष ढाली,सुमित खन्ना,उमेश संगर्ती,रोहित बोमकंटीवार, यांनी वनविभाग नाक्यावर पकडले.पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलकंठ कुकडे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here