१४ वर्ष वयोगटातील मुले वावर संघाने खो खो स्पर्धेत वांगणी संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला

जव्हार प्रतिनिधी

सुनिल जाबर

शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत पालघर जिल्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा के व्ही हायस्कूल कॉलेज जव्हार येथे दिंनाक ५,६ सप्टेंबर असे दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम असलेली रयत शिक्षण संस्थेची प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर १४ वर्ष वयोगटातील मुलांचा खो खो संघाने अंतिम सामन्यात वांगणी संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धे मध्ये शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रशाळा आणि हायस्कूल कॉलेज अशा वेगवेगळ्या शाळांनी भाग घेवून आप आपल्या संघाचे कौशल्य दाखवत या मध्ये वावर संघाने घवघवीत यश मिळवून जिल्हास्तीय स्पर्धा खेळण्या साठी सज्ज झाला आहे .या मध्ये वावर आश्रम शाळेचे रात्र दिवस मेहनत घेत असलेले सर्व खेळाडू आणि शिक्षक यांचा जव्हार तालुक्यातून वेगवेगळया प्रकारे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here