एटापली भगवंतराव महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

मारोती काबंऴे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मों.नं.9405720593

एटापल्ली :- भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे 5 सप्टेंबर डाँ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाँ.एस.एन. बुटे, तर सत्कारमूर्ती म्हणून प्रोफेसर डाँ. सुधीर भगत आणि डाँ.संदीप मैंद (रा.से.यो. प्रमुख) होते, तर प्रमुख अतिथी प्रा.डाँ.बि.डी. कोंगरे, प्रा.विनोद पत्तीवार, प्रा.डाँ.व्हि.ए. दरेकार, प्रा.निलेश दुर्गे (कार्यक्रम अधिकारी, आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभाग), प्रा.भारत सोनकांबळे, प्रा.डाँ.श्रृती गुब्बावार, प्रा.राहूल ढबाले, प्रा.डाँ.स्वाती तंतरपाळे, प्रा. चिन्ना पुंगाटी, प्रा.अतुल बारसागडे आदी उपस्थित होते. याकार्यक्रमाची सुरूवात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाँ.एस.एन. बुटे सरांनी डाँ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलीत आणि पुष्प मालार्पण करून केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाँ.एस.एन. बुटे यांच्या हस्ते डाँ.सुधीर भगत यांची प्रोफेसर पदावर पदोन्नती झाल्याबद्दल साल श्रींफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्राचार्य डाँ.बुटे यांच्या हस्ते डाँ.संदीप मैंद यांना पीएच.डी. प्राप्त झाल्याबद्दल साल श्रींफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाँ.एस.एन. बुटे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 याकार्यक्रमाचे संचालन कु. समृद्धी झाडे हिने केले तर आभार प्रदर्शन आदित्य राऊत यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी तथा बहूसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here