अलिबाग-पनवेल, पनवेल-अलिबाग विनावाहक, विनाथांबा बसेसना कार्लेखिंड येथे एस.टी स्टॉप द्या.

अलिबाग-पनवेल, पनवेल-अलिबाग विनावाहक, विनाथांबा बसेसना कार्लेखिंड येथे एस.टी स्टॉप द्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेक्रेटरी ऍड.प्रविण मधुकर ठाकूर यांची मागणी.

अलिबाग-पनवेल, पनवेल-अलिबाग विनावाहक, विनाथांबा बसेसना कार्लेखिंड येथे एस.टी स्टॉप द्या.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग व पनवेलहून विनाथांबा प्रवास करते. त्यामुळे ती प्रवाशांचा वेळ वाचविण्यास मदत करते. मात्र सदरची बस ही कार्लेखिंड येथे थांबत नाही. कार्लेखिंड परिसरामध्ये सुमारे १०० गावे आहेत. तेथील प्रवासी यांना सदर बसने प्रवास करायचा झाल्यास अलिबाग येथे यावे लागते त्यामुळे अलिबाग-पनवेल, पनवेल-अलिबाग विनावाहक, विनाथांबा बसेसना कार्लेखिंड येथे एस.टी स्टॉप द्या अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेक्रेटरी ऍड.प्रविण मधुकर ठाकूर यांनी विभागीय नियंत्रक, एस.टी. महामंडळ, रायगड-पेण यांना पत्र देऊन केली आहे. पत्राची प्रत डेपो मॅनेजर, अलिबाग एसटी. डेपो यांना देण्यात आली आहे.
अलिबाग येथून पनवेल येथे जाणारी विनावाहक विनाथांबा एसटी व पनवेलहून अलिबागम येथे येणारी विनाथांबा बस कालेंखिंड मार्गे जात येत असते. सदर प्रवासी सेवेचा लाभ अनेक उतारू नेहमी घेतात.सदर बस अलिबाग व पनवेलहून विनाथांबा प्रवास करते. त्यामुळे ती प्रवाशांचा वेळ वाचविण्यास मदत करते. मात्र सदरची बस ही कार्लेखिंड येथे थांबत नाही. कार्लेखिंड परिसरामध्ये सुमारे १०० गावे आहेत. तेथील प्रवासी यांना सदर बसने प्रवास करायचा झाल्यास अलिबाग येथे यावे लागते व पुन्हा त्यांच्या गावी जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाढतो व पैसे देखील जास्त मोजावे लागतात. सदरची बाब ही त्रासदायक आहे. तसेच अन्य बसमध्ये प्रवास
करायचा झाल्यास एसटी ची संख्या फार कमी आहे. त्यामुळे जनतेला विशेषकरून महिला, मुले व वयस्कर इसमांना गर्दीत व उभे राहून प्रवास करावा लागतो. सदरची बाब अतिशय त्रासदायक आहे. त्यामुळे सदरचा त्रास हा जर विनाथांबा, विनावाहक बस कार्लेखिंडीत थांबविल्यास जनतेच्या व प्रवाशांच्या सोईचे होईल. केवळ कार्लेखिंड येथून पनवेल येथे जाण्याकरिता आपणास एक तिकीट खिडकी कार्लेखिंड येथे उभारावी लागेल, येताना तर त्याचीही गरज नाही. आमच्या माहितीप्रमाणे प्रवासी त्याकरिता दर कमी करा अशी देखील मागणी करत नाहीत.
सदरची बस जाता-येताना कार्लेखिंड येथे थांबल्यास प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच त्यांना त्यांच्या गावी येणे सुखकर होईल. सध्याचे दिवस देखील सणांचे आहेत तसेच नियमित देखील या मार्गावरून अनेक प्रवासी प्रवास करतात. अशापरिस्थितीत आपण पनवेलहून अलिबागला येणा-या एसटी विनाथांबा बसेस व जाणा-या एसटी विनाथांबा बसेस कार्लेखिंड येथे थांबवाव्यात व प्रवाशांची गैरसोय दुर करावी अशी विनंती ॲड. प्रविण मधुकर ठाकूर) चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी यांनी एस.टी.प्रशासनाला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here