वेंगुर्ल्यात युवकाची गळफास घेऊन केली आत्महत्या………
वेंगुर्ला तालुक्यातील परबवाडा , गावंडेवाडी येथे काल रात्री एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
(हिरामण गोरेगांवकर )
वेंगुर्ला : 5 आक्टोबर 2020 रोजी तालुक्यात परबवाडा , येथील विनोद उर्फ आप्पा विजय गावंडे ( 37) हा आपल्या राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन लटकत असल्याचे दिसून आले. या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोकडाऊन मध्ये गावंडेवाडी येथील विनोद हा चतुर्थीला मुंबईहून गावी आपल्या कुटुंबा समवेत रहायला आला होता. आई , वडील, पत्नी तसेच लहान दोन मुलगे यांच्या समवेत तो गवंडेवाडी येथे घरी राहत होता. मात्र काल रात्री तो गळफास घेऊन लटकत असल्याचे पत्नी अंकिता हिने पाहिल्याने ओरडा करायला लागली. तात्काळ त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. या बाबत वेंगुर्ला पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. हे. कॉ. आर. व्ही. दळवी करीत आहेत.