मनीषा वाल्मिकी हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करा.

संत रविदास चर्मकार फाऊंडेशन ची मागणी

विनायक सुर्वे प्रतिनिधि

मंगरूळपीर:–  उत्तर प्रदेश, हाथरस या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरूणीला मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये, म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक 29 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झालेला आहे. या अमानवीय घटनेचा निषेध नोंदवत दोषींना त्वरित अटक करून योग्य कारवाई करावी अशी मागणी दि ५ रोजी संत रविदास चर्मकार फाऊंडेशन ने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

सदर निवेदनाचा आशय असा की,
आणि देशभरातील सर्वच सरकारांनी कठोर भूमिका घेऊन हाथरस हत्याकांडातील मनीषा वाल्मिकी यांचेसह देशभरातील सर्वच जातीय अत्याचारातील हत्यांचे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे,व या गुंड प्रवृत्तीच्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी या दोषीवर कठोर कारवाई व्हावी असे निवेदनात नमूद असून
या निवेदनावर संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन चे तालुकाध्यक्ष सुनिल सरदार, अजय गवारगुरू, शुभम मनवर शरद इंगळे, लिलाधर लोंढे, योगेश खिराडे, विनोद इंगळे, नितीन खिराडे, भगवान लोंढे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here