ब्रेकिंग न्यूज
चंद्रपूर पडोली येथे अज्ञात व्यक्तीचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

चंद्रपूर पडोली येथे अज्ञात व्यक्तीचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह
✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809
चंद्रपूर :- येथील येत असलेल्या पडोली येथे एका अज्ञात व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे
पडोली येथील स्मशानभुमी वालकंपाउन च्या मागे रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असुन परीसरात चर्चेला उधाण आले आहे ..ही माहिती पोलीस स्टेशन पडोली येथील पोलिस उपनिरीक्षक यांना मीळताच ते घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचे पंचनामा करून मृतदेह हे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले .. डॉक्टर ने तपासणी केली असता मृत्यू घोषीत केल्यानंतर त्याला शवविच्छेदन साठी पाठवीले आहे
सदर व्यक्ती हा अज्ञात असून त्याच्या डाव्या हातावर बंडु मेश्राम हे नाव गोंधले आहे त्या नुसार सदर ईसम हा नेमका कुठला आहे याचा तपास पडोली पोलिस स्टेशन चे उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनात एएसआय कुळसंगे मेजर हे करीत आहेत