चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग.

चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग.

चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग.
चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग.

जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809

चंद्रपूर :- चंद्रपुर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पागल बाबा नगर स्थित निर्माणाधिन इमारतीला काल सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण होती की, सर्वीकडे आगीच्या उंच उंच लाट दिसून येत होती.

चंद्रपुर येथील निर्मार्धींन मेडिकल कॉलेज इमारत परिसरात कामगारांच्या झोपड्या असून सायंकाळी स्वयंपाक करते वेळी घरगुती गॅस सिलेंडर लिक झाल्याने त्याचा स्फोट झाला, अचानक झालेल्या स्फोटाने कामगार सैरावैरा पळू लागले, मात्र आगीने रौद्र रूप धारण करीत दुसऱ्या झोपड्या पण यामध्ये जळल्या व त्यातील सिलेंडरचा स्फोट झाला. आग लागल्यावर इमारतीच्या 2 किलोमीटर वरील परिसर स्फोटाने हादरून गेला. सदर आगीत 8 सिलेंडरचा स्फोट झाला.

घटनास्थळी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून रामनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहे.
या घटनेत जीवित हानी किंवा काही कामगार जखमी झाले का? याची माहिती अस्पष्ट आहे.